Maharashtra Moving Forward – Marathi Version

महाराष्ट्र सरकार हे सध्या “एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था” बनण्याचे उद्दिष्ट असलेल्या अनेक राज्यांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत, महाराष्ट्राने व्यापार, उद्योग आणि वाहतूक सुधारण्यासाठी अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प पाहिले आहेत. गरिबी कमी करण्यासाठी, रोजगार निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांचे एकूण जीवनमान सुधारण्यासाठी पायाभूत सुविधा आणि आर्थिक वाढीवर भर देणे महत्त्वाचे आहे. तथापि, जलद विकास अनेकदा आपल्या नैसर्गिक आणि तयार केलेल्या वातावरणावर परिणाम करतो.

गरीबीचा सामना करण्यासाठी, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि २०३० पर्यंत शांतता आणि समृद्धी साध्य करण्यासाठी एक व्यापक ढाचा प्रदान करण्याच्या उद्देशाने २०१५ मध्ये, युनाइटेड नेशन्सने ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स’ किंवा ‘शाश्वत विकास उद्दिष्टे’ स्वीकारली, ज्यांना जागतिक उद्दिष्टे म्हणूनही संबोधले जाते. युनाइटेड नेशन्सने निश्चित केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी २०२३ हा अर्धा टप्पा असल्याने, विधी महाराष्ट्राची ब्रिफिंग बुक तीन श्रेणीतील सुधारणांवर लक्ष केंद्रित करते: (अ) शाश्वततेला प्रोत्साहन देणाऱ्या सुधारणा; (ब) सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणाऱ्या सुधारणा; आणि (क) अशा सुधारणा ज्यामुळे संस्था सक्षम होऊन कायद्याच्या राज्याला चालना मिळेल.

Filed Under